मुंबई – बॉलीवूडमधील गाजलेल्या ‘सडक २’ आणि ‘बाटला हाऊस’ सारख्या गाजलेल्या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री ख्रिसन परेरा हिला संयुक्त अरब अमिरातीमधील शारजात अटक करण्यात आली आहे. पत्रकार जे.डे.हत्याकांडात सीबीआयच्या रडारवर असलेला गुंड रवी रत्तेसर यांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीत तिचा हात असल्याचा संशय आहे. ख्रिसन हिला यूएईमधील शारजाच्या मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
ख्रिसनला ड्रग्जसह पकडण्यात आले होते, त्यानंतर विमानतळ अधिकाऱ्यांनी तिला ताब्यात घेतले. भारतीय दूतावासाने तिच्या अटकेची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली आहे.या ड्रग्ज प्रकरणात ख्रिसन जवळपास दोन आठवडे तुरुंगात बंद आहे. इकडे अभिनेत्रीचे कुटुंबीय तिच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.ख्रिसनच्या
कुटुंबीयांचे म्हणणे आहे की त्यांची मुलगी निर्दोष आहे. ख्रिसनचा भाऊ केविनने सांगितले की,तिला या ड्रग्ज रॅकेटमध्ये अडकवण्यात आले आहे. ख्रिसन जेव्हापासून शारजाह विमानतळावर उतरली आहे तेव्हापासून ते तिच्याशी बोलू शकले नाहीत.
भारतीय वाणिज्य दूतावासाने त्यांना ७२ तासांनंतर कळवले की, तिला अटक करून शारजाह मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्यात आले आहे.रवी नावाच्या व्यक्तीने तिला फसवल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे.कारण रवीने यापूर्वी कृष्णाची आई प्रेमिला परेरा यांना त्यांच्या मुलीची आपल्या टॅलेंट टीमशी ओळख करून देण्याच्या बहाण्याने संपर्क साधला होता.तसेच आगामी आंतरराष्ट्रीय वेब सीरिजसाठी क्रिसन भेटण्यासाठी उपलब्ध आहे का, असेही विचारले होते. मिटिंगनंतर दुबईमध्ये ख्रिसनसाठी ऑडिशन ठेवण्यात आली होती. रवीनेच येण्या-जाण्याची सर्व व्यवस्था केली होती.