मुंबई: -मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स सध्या भारत दौऱ्यावर आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी बुधवारी बिल गेट्स यांची भेट घेतली. या दिग्गजांच्या भेटीची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. सचिन तेंडुलकर यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या भेटीचा फोटो पोस्ट केला. सचिन तेंडुलकर यांच्या सोबत पत्नी अंजली तेंडुलकर देखील उपस्थित होती.
सचिनने आपल्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले की, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स भेटले तेव्हा आम्ही लोककल्याणावर चर्चा केली. सचिनने शेअर केलेल्या फोटोंवर बिल गेट्स यांनी लिहिले की, ”सचिन आरोग्यसेवा आणि मुलांची काळजी घेण्याबाबत चांगले काम करत आहे”.
सचिन तेंडुलकरने घेतली