छत्रपती संभाजीनगर :- सिल्लोड ते पाचोरा महामार्गावरील वांगी फाट्याजवळ एसटी बस आणि टेम्पोचा अपघात झाल्याची घटना आज संध्यकाळी घडली. एसटी बस आणि गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक झाली. या अपघातात आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला असून ३० पेक्षा अधिक जण जखमी आहेत. त्यातील १० जणांची प्रकृती चिंताजनक आहेत. त्यांच्यावर सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आज संध्यकाळी सहा वाजेदरम्यान सिल्लोड ते पाचोरा महामार्गावरील वांगी फाट्याजवळ एसटी बस आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की एसटी आणि टेम्पोच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातस्थळी
परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. तसेच रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारक देखील अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले. एसटी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना नागरिकांनी बाहेर काढले. तसेच रुग्णवाहिका बोलावून जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत करत वाहतूक सुरळीत केली.