छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरून १९ फेब्रुवारीपासून कुंभमेळा विशेष रेल्वे निघणार आहेत. कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी दक्षिण मध्य रेल्वेकडून छत्रपती संभाजीनगर ते पाटणा ही विशेष रेल्वे १९ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत सुटणार आहे. ही रेल्वे जालना, सेलू, परभणी, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूरमार्गे तिसऱ्या दिवशी सकाळी पाटणा येथे साडेदहा वाजताच्या सुमारास पोहचेल. तर, परतीसाठी पाटणा ते छत्रपती संभाजीनगर विशेष रेल्वे पाटणा येथून २१ आणि २७ फेब्रुवारी ला दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास त्याच मार्गाने संभाजीनगर येथे पोहचणार आहे.
संभाजीनगरमधून १९ फेब्रुवारीपासून कुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वे सेवा
