संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत टायगर पॉईंटला जाऊ नका

नाशिक : लोणावण्याजवळील टायगर पॉईंटवेळेचे बंधन न पाळणाऱ्या ८ विनापरवाना दुकान व्यावसायिकांवर लोणावळा विभाग पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्यानंतर आता संध्याकाळी टायगर पॉईंटवर संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत जाऊ नका असे लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांना आवाहन करण्यात आले आहे. संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी या पर्यटन स्थळांवर चोरी आणि लुटमारीच्या घटना वाढत असल्याचे समोर आल्यांनतर पोलिसांकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. तसेच येथील परिसरातील दुकाने आणि रेस्टॉरंट्सना देखील पोलिसांनी आवाहन केले आहे. अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे.

अलीकडच्या काळात रात्रीच्या वेळी पर्यटनस्थळांवर चोरी आणि लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, अशा गुन्ह्यांना बळी पडलेल्या पर्यटकांच्या अनेक तक्रारी आल्याची माहिती लोणावळा विभागाचे पोलिस उपअधीक्षक सत्य साई कार्तिक यांनी दिली आहे. संध्याकाळी गर्दी कमी होत असते. त्यामुळे हे लुटारू त्याचा फायदा घेत आहेत. त्यामुळे हे निर्बंध वनविभागाने लादले आहेत आणि आम्ही फक्त त्यांची अंमलबजावणी करत असल्याचे सत्य साई कार्तिक यांनी म्हटले आहे. २३ एप्रिल रोजी लोणावळा पोलिसांच्या पथकाने पहाटे ४ वाजेपर्यंत बेकायदेशीरपणे चालणाऱ्या फूड जॉइंटवर कारवाई केली. याशिवाय, पोलिसांनी वनविभागाच्या मदतीने ठिकठिकाणी सूचना फलक उभारून येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी नवीन वेळेची सूचना देणारे फलकही लावले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top