Home / News / संदीप नाईक यांच्या खेळीमुळे बेलापूरमध्ये महायुतीत एकजूट

संदीप नाईक यांच्या खेळीमुळे बेलापूरमध्ये महायुतीत एकजूट

नवी मुंबई : भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेणारे संदीप नाईक यांच्या नव्या राजकीय भूमीकेमुळे बेलापूर...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी मुंबई : भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेणारे संदीप नाईक यांच्या नव्या राजकीय भूमीकेमुळे बेलापूर विधानसभा मतदारसंघात मंदा म्हात्रे यांच्या समर्थनासाठी महायुतीत नव्याने एकजूट होताना दिसत आहे. विजय नहाटा यांना रिंगणात उतरवून बेलापूरमध्ये म्हात्रे आणि नाईक अशा दोघांविरोधात नवी आघाडी उभारण्याच्या प्रयत्नात असलेले शिवसेनेचे (शिंदे) नेते संदीप नाईक यांच्या नव्या खेळीमुळे सावध झाले असून शिंदे सेनेची संपूर्ण ताकद मंदा म्हात्रे यांच्यामागे उभी करण्याच्या हालचाली पक्षात सुरु झाल्या आहेत. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही म्हात्रे यांच्या विजयासाठी बेलापूरात संपूर्ण ताकद उभी करण्याच्या सूचना स्थानिक नेत्यांना दिल्याचे वृत्त आहे.
गेल्या काही दिवसांपासून बेलापूर विधानसभा मतदारसंघ सातत्याने चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. भाजपने बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करताच संदीप नाईक यांनी बंडाचे निशाण फडकावले. समर्थकांच्या बैठका, मेळावे घेत संदीप यांनी मंगळवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात प्रवेश केला. ऐरोली विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईक भाजपमधून तर बेलापूरमधून संदीप महाविकास आघाडीतून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या