Home / News / संदिपान भुमरेंचा पालकमंत्रिपदाचा राजीनामा! अब्दुल सत्तार नवे पालकमंत्री

संदिपान भुमरेंचा पालकमंत्रिपदाचा राजीनामा! अब्दुल सत्तार नवे पालकमंत्री

छत्रपती संभाजीनगर – शिवसेना शिंदे गटाचे नेते संदिपान भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. संदिपान भुमरे यांची खासदारपदी...

By: E-Paper Navakal

छत्रपती संभाजीनगर – शिवसेना शिंदे गटाचे नेते संदिपान भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. संदिपान भुमरे यांची खासदारपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून अब्दुल सत्तार आता नवे
पालकमंत्री असतील. शिवसेनेचे नेते संदिपान भुमरे यांची खासदारपदी निवड झाली आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. आता छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदाचाही राजीनामा त्यांनी दिला. शिवसेनेचे नेते संदिपान भुमरे यांची खासदारपदी निवड झाली आहे. संदिपान भुमरे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत इम्तियाज जलील आणि ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. खासदारपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. मात्र पालकमंत्रिपद त्यांच्याकडेच होते. त्यामुळे संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदाचा ते राजीनामा देणार का? तसेच त्यांनी राजीनामा दिला तर पालकमंत्री कुणाला करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज त्यांनी राजीनामा देताच अब्दुल सत्तार यांच्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली.

Web Title:
संबंधित बातम्या