पणजी – संजीवनी साखर कारखान्यातील १६९ कर्मचाऱ्यांबाबत अंतिम निर्णय पुढील आठवड्यात होणार आहे.
संजीवनी साखर कारखाना बंद असल्याने तेथे कार्यरत ९१ कायमस्वरूपी आणि ७८ कंत्राटी अशा १६९ कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सरकारने या कर्मचाऱ्यांसमोर स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेण्याची अट ठेवली होती. परंतु, कर्मचारी व्हीआरएस घेण्यास तयार नाहीत. सरकारने आपली व्यवस्था इतर खात्यांमध्ये करावी, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे. कृषी खात्याने या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्याची मुदत सुरुवातीला ३० सप्टेंबरपर्यंत दिली होती. पण, त्यानंतर ती डिसेंबरअखेरपर्यंत वाढवली. सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर पुढील आठवड्यात कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येणार असल्याचे कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी सांगितले.