संगमनेर-अकोले रस्त्यावर
भीषण अपघातात तीन ठार

अहमदनगर: – अहमदनगरच्या संगमनेर येथे दुधाचा टॅंकर आणि दोन दुचाकी वाहने यांचा भीषण अपघात होऊन दुचाकीवरील तीन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री साडे आठच्या सुमारास संगमनेर – अकोले रस्त्यावर मंगळापुर शिवारात बर्फ कारखान्यापासून काही अंतर पुढे घडला.

ऋषीकेश हासे (वय २० वर्षे), सुयोग हासे (वय २० वर्षे आणि निलेश सिनारे (वय २६ वर्षे) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाग्रस्त तरुण दुचाकीवरून अकोलेच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी संगमनेरवरून एक दुधाचा टँकर भरधाव वेगात येत होता.या अपघातानंतर घटनास्थळी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तरुणांचे मृतदेह ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Scroll to Top