अहमदनगर – संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी येथे आज बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. संगिता वर्पे (४३) असे मृत महिलेचे नावे आहे. घराबाहेर कपडे धुण्यासाठी जात असताना या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. या महिलेला बिबट्याने २० ते २५ फुट अंतरावर घराजवळील शेतात ओढत नेले. या घटनेत गंभीर झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी रहिवासी करीत आहेत.
संगमनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
