श्वास घेण्यास त्रास होत असल्याने
पोप फ्रान्सिस रुग्णालयात दाखल

व्हॅटिकन सिटी – पोप फ्रान्सिस यांना श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोप यांच्या घशामध्ये श्वासोच्छवासाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, रोम स्थित रुग्णालयाकडून पोप यांच्या प्रकृतीची माहिती देताना, हा संसर्ग कोरोना व्हायरसशी संबंधित नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पोप फ्रान्सिस पुढील काही दिवस रुग्णालयातच राहतील, असे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अलीकडच्या काही दिवसांत पोप यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यानंतर बुधवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि ते पुढचे काही दिवस रोममधील रुग्णालयात राहतील. रुग्णालयाचे प्रवक्ते मॅटेओ ब्रुनी यांनी रात्री उशिरा दिलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे. ८६ वर्षीय पोप, यांना जुलै २०२१ मध्ये जेमेली हॉस्पिटलमध्ये दहा दिवसांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी जेमेली हॉस्पिटलमध्ये ३३ सेमीचा पोप यांचा फुफ्फुसाचा काही भाग काढून टाकण्यात आला होता. त्यानंतर अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले. अलीकडच्या काही दिवसांत पोप यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यानंतर ते बुधवारी जेमेली हॉस्पिटलमध्ये चाचणीसाठी पोहोचले. चाचणीत श्वासोच्छवासाच्या संसर्गाची पुष्टी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यातून सावरण्यासाठी त्यांना काही दिवस रुग्णालयातच राहावे लागणार आहे.

तब्येतीची तक्रार असतानाही काही दिवसांपूर्वी फ्रान्सिस सामान्य लोकांना नियमित भेटताना दिसले होते. यातही त्यांनी लोकांशी हस्तांदोलन केले आहे. आपल्या अनुयायांमध्ये ते रमतात. लहान मुलांमध्येही तितकॅच मायेने वावरताना ते दे दिसले आहेत. आता त्यांची प्रकृती खालावल्यावर जगभरातून लोक त्यांच्यासाठी प्रार्थना करत असून, अर्जेंटिनाचे जेसुइट फ्रान्सिस, इटालियन बिशप यांच्यासह अनेक ठिकाणी पोप यांच्यासाठी प्रार्थना केल्या जात असून, त्यांनी लवकर बरे व्हावे अशा शुभेच्छाही व्यक्त केल्या जात आहेत.

Scroll to Top