पुणे – शहरातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंदिरात आज मकर संक्रांतीनिमित्त श्री गणेशाला तिळगुळाची आकर्षक आरास केली होती. यावेळी गणरायाला हलव्याच्या दागिन्यांनी सजवण्यात आले होते. दागिने आणि तिळगुळाच्या आराशीमुळे मंदिराची शोभा वाढली होती. संक्रातनिमित्ताने आज शेकडो भाविक श्रींच्या दर्शनासाठी श्री दगडूशेठ गणपती मंदिरात आले होते.
श्री दगडूशेठ गणपतीला संक्रांतनिमित्त तिळगूळ आरास
