ठाणे – मालवण वायरी येथील श्री केळबाई देवीचा जत्रौत्सव 27 ते 29 मार्चपर्यंत भरणार आहे.या जत्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी सांयकाळी 7 वाजता भजन तर रात्री करमणुकीचे कार्यक्रम होणार आहेत.
दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी 8.30 वाजता समुद्र स्नानासाठी देवीची सवाद्य पालखी मिरवणूक, दुपारी 12 वाजता सामूहिक अभिषेक आरती, दुपारी 1.30 वाजता महाप्रसाद, ओटी भरणे, संध्याकाळी 4 वाजता श्री सत्यनारायण महापुजा, 6 वाजता क्षवणीय किर्तन आणि भजन, रात्री 9 वाजता आरती,रात्री 10 वाजता मुलांचे करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. जत्रौत्सवाच्या तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी बुधवारी सकाळी 8.30 वाजता देवीच्या मुर्तीवर पंचामृत अभिषेक, सकाळी 10 वाजता सामूहिक अभिषेक, दुपारी 12 वाजता आरती, 1 वाजता महाप्रसाद ओटी भरणे, 7 वाजता भजन, रात्री 10 वाजता देवीची मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा, रात्री 11 वाजता दशावतारी नाटक होणार असल्याची माहिती समस्त मयेकर बंधू मंडळचे अध्यक्ष बलवंतराव मयेकर यांनी दिली.
श्री केळबाई देवीचा जत्रौत्सव