तापोळा – महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थान श्री उत्तेश्वर देवाची यात्रा उद्यापासून सुरू होणार आहे. ती १५ जानेवारीपर्यंत चालणार आहे. कोयना जलाशयाच्या परिसरातील १०५ गावांचे प्रमुख देवस्थान असलेल्या या यात्रेसाठी संपूर्ण तापोळा परिसर गजबजलेला आहे. ठाणे, मुंबई ,पनवेल, नवी मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून भाविक यात्रेसाठी आले आहेत. श्री ऊत्तेश्वर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुलदैवत असल्यामुळे ते आणि त्यांचा पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत.
यात्रेतील प्रमुख कार्यक्रमांमध्ये १३ जानेवारी रोजी संध्याकाळी ४ ते ७ वाजता वानवली उतेकर येथे श्री ऊत्तेश्वर यांचा घाणा कार्यक्रम, रात्री ९ वाजता पालखी यात्रा, १४ जानेवारी रोजी सकाळी ७ ते ९ वाजता अभिषेक कार्यक्रम, तसेच दीपमाळ प्रज्वलन आणि कासेगावकर कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा यांचा समावेश आहे. १५ जानेवारी रोजी श्री ऊत्तेश्वर देवांचा शाही विवाह सोहळा, पालखी दर्शन आणि तळे भरणे कार्यक्रम पार पडणार आहेत. या यात्रेसाठी श्री उत्तेश्वर देवस्थान ट्रस्ट व समस्त उतेकर व गोगावले परिवाराने मोठ्या उत्साहात तयारी केली आहे.
श्री उत्तेश्वर यात्रेला आजपासून सुरुवात
