श्रीनगर – श्रीनगर ते कटरा या मार्गावर काल संध्याकाळी पहिल्या वंदे भारत रेल्वेची चाचणी यशस्वी झाली आहे. या भागातील तापमानाचा विचार करुन ही विशेष वंदे भारत तयार करण्यात आली असून ही रेल्वे उणे ३० अंश सेल्सिअसमध्येही हे रेल्वेगाडी सहज प्रवास करु शकणार आहे. या भागावर धावणारी ही तिसरी वंदे भारत रेल्वे असेल. मात्र यापूर्वी कटरा ते श्रीनगर दर आठवड्याला किमान तीन ट्रेन धावतात. या ट्रेनचा पावणेदोन तासांचा हा प्रवास असतो .भगव्या रंगातील ही वंदे भारत खास तयार करण्यात आली आहे. या रेल्वेच्या खिडक्यांवर कधीही बर्फ साचणार नाही. या रेल्वेत विमानातील काही सुविधा देण्यात आल्या आहेत. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वेचे लोकार्पण होणार आहे. वैष्णो देवी कटरा ते श्रीनगर या मार्गावर ही रेल्वे चालणार असून ती जगातील सर्वात उंचीच्या पुलावरुनही धावणार आहे. या रेल्वेत वॉटर टँक सिलीकॉन हिटिंग पॅड, हिटींग प्लबिंग लाईन लावण्यात आली असून ड्रायव्हरच्या केबिनमध्ये ट्रिपल एअर विंडही लावण्यात आली आहे. यासाठी प्रवाशांना दीड हजार ते अडीच हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
श्रीनगर कटरा वंदे भारत रेल्वेची चाचणी यशस्वी
