श्रावणात इचलकरंजीतून सवलतीच्या एसटी प्रवास

इचलकरंजी- श्रावण महिन्यात ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांना धार्मिक स्थळी जाता यावे म्हणून इचलकरंजी आगारातून सवलतीच्या दरात एसटी उपलब्ध केल्या आहेत. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. सवलतीच्या दरात ७५ रुपयांपासून ८५० रुपयांपर्यंत जाऊन येण्याची ही एसटी सेवा आहे.

आठवड्यातील सात दिवस रोज एक धार्मिक स्थळासाठी ही बससेवा असणार आहे.त्यामध्ये सोमवारी इचलकरंजी- मारलेश्वर व इचलकरंजी रामलिंग खिद्रापूर,मंगळवारी इचलकरंजी-गणपतपुळे आणि इचलकरंजी-पंढरपूर- तुळजापूर, बुधवारी इचलकरंजी-पंढरपूर, गुरुवारी इचलकरंजी- नृसिंहवाडी-औदुंबर, शुक्रवारी इचलकरंजी-
पंढरपूर- तुळजापूर,शनिवारी इचलकरंजी ते अकरा मारुती दर्शन आणि रविवार इचलकरंजी ११ मारुती दर्शन व इचलकरंजी- जोतिबा-आदमापूर अशा बस सेवा सुरु झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top