जालना: शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन बालकांसह एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जालना तालुक्यातील सामनगाव येथे घडली आहे. ओमकार कृष्णा पडूळ (६ वर्ष), भागवत कृष्णा पडूळ (९ वर्ष), युवराज भागवत इंगळे (५ वर्ष), भागवत जगन्नाथ इंगळे (वय ३२ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.
भागवत जगन्नाथ इंगळे त्यांच्या मालकांच्या दोन मुलांसह स्वत:च्या मुलाला शेतामधील शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. मुलं शेततळ्यात पोहायला उतरली. थोड्या वेळाने ही मुलं पाण्यात अचानक बुडू लागली. मुलांना वाचवण्यासाठी भागवत शेततळ्यात उतरले. पण त्यांना मुलांना वाचवण्यात अपयश आलं. तिन्ही मुलांसोबत भागवतदेखील शेततळ्यात बुडाले.