नवी दिल्ली – चायनीज खाद्य पदार्थांमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या तयार शेजवान चटणीचा वाद आता दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचला आहे. टाटा समूहातील कॅपिटल फुड्स या कंपनीने डाबर इंडिया लिमिटेड या कंपनीकडून शेजवान चटणी या ब्रँडनेमचा बेकायदेशीरपणे वापर होत असल्याचा दावा केला आहे.
शेजवान चटणी या ब्रँडनेममध्ये आपण फार मोठी गुंतवणूक केली असून त्याच्या जाहिरातींमुळे आता हा ब्रँड लोकप्रिय झाला आहे, असा कॅपिटल फुडसचा दावा आहे. तर शेजवान चटणी हे नाव ब्रँड म्हणून नोंदणी केले जाऊ नये, अशी डाबर इंडिया लिमिटेड कंपनीची मागणी आहे. डाबरनेही या प्रकरणी ऑक्टोबर २०२४ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून ५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.