अलिबाग- शेतकरी कामगार पक्षाकडून चार उमेदवार जाहीर केले आहेत. अलिबाग येथील शेतकरी भवनात आज शेकापची बैठक झाली. या बैठकीत शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी चार उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये जयंत पाटील यांची सून चित्रलेखा पाटील (अलिबाग), प्रीतम म्हात्रे (उरण), बाळाराम पाटील (पनवेल), अतुल म्हात्रे (पेण) यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने उमेदवार जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडली का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.