मुंबई – आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. सावध सुरुवातीनंतर निर्देशांक काहीसे वधारले. मात्र त्यानंतर बाजारात घसरण झाली. दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले.दिवसभराच्या उलाढालीअंती राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ११३ अंकांनी घसरून २३,०९२ अंकांवर तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३२९ अंकांच्या घसरणीसह ७६,१९० अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी २२१ अंकांनी घसरून ४८,३६७ अंकांवर बंद झाला.सेन्सेक्समधील ३० पैकी ११ कंपन्यांचे शेअर वाढले, तर १९ कंपन्यांचे शेअर घसरले.त्याचप्रमाणे निफ्टीतील ५० कंपन्यांपैकी १९ कंपन्यांचे शेअर वाढले. तर ३१ कंपन्यांचे शेअर घसरले.
शेअर बाजार घसरणीसह बंद दिवसभरात मोठे चढ-उतार
