शेअर बाजारासाठी ‘ब्लॅक मंडे’सेन्सेक्स,निफ्टीत मोठी घसरण

मुंबई – शेअर बाजारासाठी आजचा दिवस ब्लॅक मंडे ठरला. सेन्सेक्स, निफ्टी, बँक निफ्टी आणि मिडकॅप निर्देशांक घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स ९४२ अंकांनी घसरला. तर निफ्टी २४००० च्या खाली घसरला.रियल इस्टेट, ऑईल अँड गॅस शेअर्समध्ये मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागला. ऑटोमोबाईल, मेटल आणि फार्मा निर्देशांकातील घसरणीचाही बाजारावर परिणाम झाला.सेन्सेक्स ९४२ अंकांच्या घसरणीसह ७८,७८२.२४ अंकावर बंद. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३०९ अंकांच्या घसरणीसह २३९९५.३५ अंकांवर बंद झाला. ऑटो शेअरमधी विक्रिच्या माऱ्यामुळे बाजार सावरू शकला नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top