शेअर बाजाराला चिनी विषाणूचाफटका !दोन्ही निर्देशांक घसरले

मुंबई – आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज शेअर बाजाराची सुरुवात तेजीने झाली. मात्र भारतात एचएमपीव्ही या विषाणूचे रुग्ण आढळल्याचे वृत्त येऊन थडकताच परिस्थिती बदलली. दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण सुरू झाली.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८४९.५० अंकांच्या घसरणीसह ७८,३७३.६१ च्या पातळीवर घसरला.तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २६६.५० अंकांनी घसरून २३,७३८.२५ अंकावर आला.आज सेन्सेक्स ७९,२८१.६५ च्या पातळीवर उघडला. त्यानंतर काही मिनिटांतच तो २८०.७५ अंकांच्या वाढीसह ७९,५०३ च्या पातळीवर पोहोचला. निफ्टीदेखील २४,०४५.८० अंकांवर उघडला आणि २४,०८७.७५ अंकांवर गेला. आजची ही घसरण एचएमपीव्हीच्या वृत्तामुळे झाली,अशी चर्चा शेअर बाजारात होती. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top