शेअर बाजारात विक्रीचा मारा! दोन्ही निर्देशांकांत मोठी घसरण

मुंबई – शेअर बाजारात कालच्या जबरदस्त तेजीनंतर आज दुसऱ्याच दिवशी विक्रीचा सपाटा लावल्याने मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८३६ अंकांनी घसरून ७९,५४१ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २८४.७० अंकांनी घसरून २४,१९९.३५ अंकांवर बंद झाला.
बाजाराचे व्यवस्थापन करणाऱ्या निफ्टी आयटीमध्येही घसरण नोंदविली गेली. ३० कंपन्यांवर आधारित सेन्सेक्समधील केवळ दोन कंपन्यांचे शेअर वाढीसह बंद झाले. तर उर्वरित २८ कंपन्यांचे शेअर घसरणीसह बंद झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top