Home / News / शेअर बाजारात मोठी वाढ ५ दिवसांच्या घसरणीला ब्रेक

शेअर बाजारात मोठी वाढ ५ दिवसांच्या घसरणीला ब्रेक

मुंबई – देशांतर्गत शेअर बाजारात पाच दिवसांच्या सलग घसरणीनंतर आज मोठी वाढ दिसून आली. खरेदीचा जोर वाढल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण...

By: E-Paper Navakal

मुंबई – देशांतर्गत शेअर बाजारात पाच दिवसांच्या सलग घसरणीनंतर आज मोठी वाढ दिसून आली. खरेदीचा जोर वाढल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण होते.मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६०२ अंकांनी वाढून ८०,००५ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५८ अंकांनी वाढून २४,३३९ अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी ४७१ अंकांनी वाढून ५१,२५९ अंकांवर बंद झाला.आजच्या व्यवहारात सर्वच क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले.बँकिंग, फार्मा, एफएमसीजी, मेटल, आयटी आणि वाहननिर्मिती क्षेत्रातील शेअरमध्ये तेजी दिसून आली. निफ्टीचा मिड कॅप निर्देशांक ०.८३ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. तर स्मॉलकॅप निर्देशांक १.२० टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

Web Title:
संबंधित बातम्या