मुंबई – शेअर बाजारात आज मोठी पडझड झाली. सोमवारच्या जोरदार वाढीनंतर आज शेअर बाजार दुप्पट वेगाने घसरला. या पडझडीत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १२०० अंकांनी कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ३२० अंकांच्या घसरणीसह २३,०२४ वर बंद झाला.दिवस अखेरीस सेन्सेक्स १२३५ अंकांनी घसरून ७५,८३८ अंकांवर स्थिरावला. बँक निफ्टीत ७७९ अंकांनी घसरून ४८,५७० अंकावर बंद झाला.मुंबई शेअर बाजाराच्या सर्व क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये विक्रीचा मारा दिसून आला.परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी लावलेल्या विक्रीच्या माऱ्याचा परिणाम आज पुन्हा एकदा बाजारावर दिसून आला. प्रमुख निर्देशांक १ ते २ टक्के घसरून एकूण बाजार भांडवल ७.४८ लाख कोटींनी घसरले.
शेअर बाजारात मोठी पडझड सेन्सेक्स १२०० अंकांनी कोसळला
