मुंबई – शनिवारी सादर झालेल्या आगामी वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात अनेक मोठया घोषणा करूनही आज पहिल्याच दिवशी बाजाराने नकारात्मक प्रतिसाद दिला. दोन्ही निर्देशांकांमध्ये आज मोठी घसरण झाली.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आज १२१ अंकांनी घसरून २३,३६१ अंकांवर तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३१९ अंकांच्या घसरणीसह७७,१८६ अंकांवर बंद झाला.बँक निफ्टी २९६ अंकांनी घसरून ४९,२१० अंकांवर बंद झाला. बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये आज सर्वाधिक ४२५.७० अंकांची (५.३२ टक्के) वाढ झाली. तर सर्वाधिक १५८.३० घसरण लार्सन अँड टुब्रोच्या शेअरमध्ये झाली.निफ्टी आयटी क्षेत्रासाठी आजचा दिवस भरघोस तेजीचा तर निफ्टी एनर्जी क्षेत्रासाठी मोठ्या घसरणीचा ठरला.
शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्सने ३१९ अंक गमावले
