मुंबई – भारतीय शेअर बाजारांत आज पुन्हा एकदा मोठी घसरण झाली.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ९३० अंकांनी चक तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३०९ अंकांनी घसरला. या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे साडे आठ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
सेन्सेक्स दिवसभराच्या व्यवहाराअंती ८०, २२० वर तर निफ्टी २४, ४७२ अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी ७०५ अंकांनी घसरून ५१स २५७ अंकांवर बंद झाला.मिडकॅप निर्देशांकातही दिवसभरात १५०० अंकांची मोठी घसरण झाली.त्याचवेळी स्मॉलकॅप निर्देशांकात ७०० अंकांची घसरण झाली.
शेअर बाजारात पुन्हा घसरण! साडेआठ लाख कोटींचे नुकसान
