मुंबई – आठवड्यांच्या पहिल्या दिवशीच म्हणजे आज सोमवारी शेअरबाजारात तेजी राहिली. निफ्टी १४१ अंकांच्या वाढीसह २३, ३४४वर बंद झाला. तर सेन्सेक्स ४५४ अंकांनी वाढून ७७,०७३वर बंद झाला. बॅक निफ्टी अंकांच्या वाढीसह ४९,३५०वर बंद झाला.सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी १७ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह बंद झाला. उर्वरित १३ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाला. निफ्टीमधील ५० शेअर्सपैकी २९ कंपन्यांचे शेअर्स वाढले. उर्वरित २१ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. कोटक महिंद्रा बॅकेचे शेअर्स सर्वाधिक ९.१५ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर झोमॅटोचे शेअर्स सर्वाधिक ३.१४ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.
शेअर बाजारात तेजी सेन्सेक्स ४५० अंकांनी वाढला
