मुंबई – देशांतर्गत शेअर बाजारात काल झालेल्या घसरणीनंतर आज मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने १४०० अंकांची मोठी झेप घेतली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीदेखील ३७८ अंकांच्या वाढीसह २३,७३९ अंकांवर बंद झाला.सेन्सेक्स १,३९७ अंकांनी वाढून ७८,५८३ अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी ९४७ अंकांच्या वाढीसह ५०,१५७ अंकांवर पोहोचला. आजच्या व्यवहारांत श्रीराम फायनान्स, एल अँड टी, अदानी पोर्टस, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि इंडसइंड बँक या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ झाली. दुसरीकडे ट्रेंट, ब्रिटानिया इंडस्ट्रीज , हिरो मोटोकॉर्प, नेस्ले आणि आयशर मोटर्स सर्वाधिक घसरले.
शेअर बाजारात तेजीचे वारे १४०० अंकांची उसळी
