Home / News / शेअर बाजारात घसरण

शेअर बाजारात घसरण

मुंबई – मुंबई शेअर बाजाराच्या आज सकाळच्या सत्रात निर्देशांकात घसरण झाली .सकाळी बाजार सुरु झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५५०...

By: E-Paper Navakal

मुंबई – मुंबई शेअर बाजाराच्या आज सकाळच्या सत्रात निर्देशांकात घसरण झाली .सकाळी बाजार सुरु झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५५० अंकानी घसरला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही १०० अंकांची घसरण झाली .काल अर्थसंकल्प सादर झाल्यापासून शेअर बाजारात घसरण होत आहे.सकाळच्या सत्रातील या घसरणीनंतर दिवसभरात शेअर बाजार काहिसा सावरला तरी तो दिवसअखेर २८० अंकांची घसरण नोंदवत ८० हजार १४९ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सकाळच्या सत्रानंतर सावरला तरीही दिवसअखेर तो ६६ अंकांची घसरण नोंदवत २४ हजार ४१४ अंकांवर बंद झाला.

Web Title:
संबंधित बातम्या