मुंबई – गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायक ठरला.बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील समभागांची गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्यामुळे दोन्ही भांडवली बाजार जोरदार वाढीसह बंद झाला.
स्मॉल-कॅप आणि मिड-कॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये विशेष तेजी दिसून आली.आजच्या सत्राच्या अखेरीस मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३७८ अंकांच्या वाढीसह ८०,९०२ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १२६ अंकांच्या वाढीसह २४,७०० अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्समधील ३० पैकी २४ कंपन्यांच्या समभागांमध्ये वाढ झाली.तर ६ कंपन्याच्या समभागांमध्ये घसरण झाली. निफ्टीच्या ५० कंपन्यांपैकी ३८ कंपन्यामध्ये वाढ तर १२ कंपन्यांमध्ये घसरण झाली.