मुंबई – अमेरिकेच्या भांडवली बाजारातून नकारात्मक संकेत मिळाल्याने आज भारतीय भांडवल बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी प्रत्येकी दीड टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.
सेन्सेक्समध्ये आज दिवसभराच्या व्यवहारात १ हजारहून अधिक अंकांची तर निफ्टी ३०० अंकांची घसरण झाली. आठवड्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स १.०१७.२३ अंकांनी घसरून ८१,१८३.९३ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी २९२.९५ अंकांच्या घसरणीसह २४,८५२.१५ वर बंद झाला.
मुंबई शेअर बाजाराचे भांडवल काल ४६५.६६ लाख कोटी रुपये एवढे होते. ते आज ४६०.३६ लाख कोटी रुपयांवर आले. म्हणजे आजच्या एका दिवसात गुंतवणूकदारांचे ५.३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.