मुंबई – देशांतर्गत शेअर बाजारात सुरू असलेले घसरणीचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.मागील चार – पाच महिन्यांपासून होत असलेल्या घसरणीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ३० वर्षांच्या इतिहासातील दुसऱ्या सर्वात मोठ्या मासिक घसरणीजवळ येऊन ठेपला आहे.चालू महिन्यात निफ्टीमध्ये आतापर्यंत ४ टक्क्यांची घसरण झाली आहे. सप्टेंबर २०२४ च्या अखेरीस निफ्टी २५,८११ च्या पातळीवरून १२.६ टक्क्यांनी घसरला आहे. घसरणीत निफ्टीमध्ये समावेश असलेल्या पाच पैकी एक शेअर २८ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली आहे.अदानी एंटरप्रयझेस, ट्रेंट, एशियन पेंटस, बीपीसीएल, हिरो मोटोकॉर्प बजाज ऑटो आणि टाटा मोटर्स आदि प्रमुख कंपन्यांच्या समभागांमध्ये ३१ ते ३३ टक्के घसरण झाली आहे.हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग अनुक्रमे २४स२२ आणि १८ टक्के घसरले आहेत. तर विप्रो, बजाज फायनान्स आणि कोटक महिंद्रा बँक या तीन समभागांमध्ये मात्र या घसरणीतही ६ ते ९ टक्के तेजी दिसून आली.
शेअर बाजारातील घसरण थांबेनानिफ्टी ३० वर्षांच्या नीचांकाजवळ
