शेअर बाजारातील गडगडला ९ दिवसांच्या तेजीला ब्रेक

मुंबई : तीन दिवसांच्या सुट्टीनंतर या आठवड्याचा पहिला दिवस भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत निराशाजनक ठरला. आयटी (तंत्रज्ञान) शेअर्समधील घसरणीमुळे भारतीय मार्केटमध्ये मोठी पडझड झाली ज्याचा सर्वाधिक फटका या क्षेत्रातील दुसरी आघाडीची कंपनी – इन्फोसिसला बसला. इन्फोसिसचे शेअर्स ९ टक्क्यांनी घसरले. मात्र दुपारच्या दरम्यान, बँकिंग आणि एफएमसीजी शेअर्समधील खरेदीमुळे बाजार सावरला.

इन्फोसिसच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीने आयटी कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये हजारो कोटी रुपये बुडाले. सोमवारी मार्केट उघडल्यानंतर काही सेकंदातच इन्फोसिसचे शेअर्स कोसळले, ज्यामुळे भारतीय आयुर्विमा महामंडळ आणि मूर्ती कुटुंबासारख्या प्रमुख भागधारकांचे मोठे नुकसान झाले. मात्र दुपारी बँकिंग आणि एफएमसीजी शेअर्समधील खरेदीमुळे बाजार सावरला. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या शेवटच्या तिमाहीतील खराब निकालाचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर झाल्याचे बोलले जात आहे. आजच्या व्यवहाराच्या शेवटी बीएसई सेन्सेक्स 524 अंकांनी घसरून 59,896 वर तर निफ्टी 126 अंकांच्या घसरणीसह 7,701 अंकांवर बंद झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top