मुंबई – जागतिक आणि आशियाई बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजाराने आज मोठी उसळी घेतली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने ८४,६९४ चा सार्वकालीक उच्चांक नोंदवला. त्यानंतर सेन्सेक्स १,३५९ अंकांनी वाढून ८४,५४४ वर बंद झाला. तर निफ्टीने २५,८४९ च्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. त्यानंतर निफ्टी ३७५ अंकांच्या वाढीसह २५,७९० वर स्थिरावला. त्यामुळे गुंतवणूकदारांना ६.५ लाख कोटींचा फायदा झाला आहे.सेन्सेक्सवर एम अँड एमचा शेअर्स ५.५ टक्के वाढीसह आघाडीवर होता. त्याचबरोबर आयसीआयसीआयचा शेअर्स ४ टक्क्यांहून अधिक वाढला. जेएसडब्ल्यू स्टील, एलटी हे शेअर्स प्रत्येकी प्रत्येकी ३ टक्क्यांनी वाढले. भारती एअरटेल, नेस्ले इंडिया, अदानी पोर्ट्स, मारुती, हिंदुस्तान युनिलिव्हर, कोटक बँक हे शेअर्स प्रत्येकी २ टक्क्यांनी वाढले. निफ्टीवर एम अँड एम, आयसीआयसीआय बँक, जेएसडब्ल्यू स्टील, एलटी आणि भारती एअरटेल हे शेअर्स २ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. तर ग्रासीम, एसबीआय हे शेअर्स घसरले.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |