मुंबई – देशांतर्गत शेअर बाजारात आज तेजी दिसून आली.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स दिवसभरात ३०० अंकांनी वाढला.तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ८६ अंकांनी वाढून २३,२४९ अंकांवर बंद झाला.आजच्या उलाढालीत टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये मात्र सर्वाधिक ७.३७ टक्क्यांची घसरण झाली.सेन्सेक्स २२६ अंकांनी वाढून ७६, ७५९ अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी १४६ अंकांनी वाढून ४९, ३११ अंकांवर बंद झाला. निफ्टी केंद्रीय सार्वजनिक आस्थापना निर्देशांक (सीपीएसई) आणि निफ्टी रियल्टी या निर्देशांकांमध्ये सर्वाधिक वाढ झाली.त्याच वेळी निफ्टी आयटी आणि निफ्टी मीडिया निर्देशांकांत घसरण झाली.सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी १८ कंपन्यांच्या शेअरमध्ये वाढ तर उर्वरित १२ कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली.
शेअरबाजार तेजीसह बंद टाटा मोटर्सचे शेअर कोसळले
