शिवसेना शिंदेंची पहिली यादी स्वतः कोपरीतून लढणार

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी आज शिवसेना शिंदे गटाची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील बहुतेक मंत्र्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जोगेश्‍वरी पूर्वमधून खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज असलेल्या किरण सामंत यांना राजापूरमधून तिकीट देण्यात आले आहे.
महायुतीतील भाजपाने यापूर्वीच 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेने 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली. यात मुख्यमंत्री शिंदे हे आपल्या ठाण्यातील कोपरी पाचपखाडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्री त्यांच्या पूर्वीच्याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव अभिजित अडसूळ यांना दर्यापूर राखीव मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. तर संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे यांना पैठणमधून तिकीट देण्यात आले आहे. मुंबईतील सदा सरवणकर, यामिनी जाधव, प्रकाश सुर्वे, मंगेश कुडाळकर तसेच ठाण्याच्या ओवळा माजिवडा मतदारसंघातून प्रताप सरनाईक या विद्यमान आमदारांचे मतदारसंघ कायम ठेवण्यात आले आहेत.
कोपरी-पाचपाखाडी – एकनाथ शिंदे, साक्री (राखीव)- मंजुळाताई तुळशीराम गावीत, चोपडा (राखीव) – चंद्रकांत बळवंत सोनावणे, जळगाव, ग्रामीण – गुलाबराव रघुनाथ पाटील, एरंडोल – अमोल चिमणराव पाटील, पाचोरा – किशोर धनसिंग पाटील, मुक्ताईनगर – चंद्रकांत निंबा पाटील, बुलडाणा – संजय रामभाऊ गायकवाड, मेहकर (राखीव) – संजय भास्कर रायमुलकर, दर्यापूर राखीव – अभिजित आनंदराव आडसूळ, रामटेक- आशिष नंदकिशोर जैस्वाल, भंडारा (राखीव) – नरेंद्र भोजराव भोंडेकर, दिग्रज – संजय दुलिचंद राठोड, नांदेड उत्तर – बालाजी देविदासराव कल्याणकर, कळमनुरी – संतोष लक्ष्मणराव बांगर, जालना – अर्जुन पंडीतराव खोतकर, सिल्लोड- अब्दुल सत्तार अब्दुल नबी, छ. संभाजीनगर (मध्य) – प्रदीप शिवनारायण जैस्वास, छ. संभाजीनगर – पश्‍चिम (राखीव) – संजय पांडुरंग शिरसाट, पैठण – विलास संदीपान भुमरे, वैजापूर – रमेश नानासाहेब बोरनारे, नांदगाव – सुहास द्वारकानाथ कांदे, मालेगाव -बाह्य – दादाजी दगडुजी भुसे, ओवळा माजीवडा – प्रताप बाबुराव सरनाईक, मागाठाणे – प्रकाश राजाराम सुर्वे, जोगेश्‍वरी पूर्व – मनिषा रवींद्र वायकर, चांदिवली – दिलीप भाऊसाहेब लांडे, कुर्ला राखीव – मंगेश अनंत कुडाळकर, माहीम – सदानंद शंकर सरवणकर, भायखळा – यामिनी यशवंत जाधव, कर्जत – महेंद्र सदाशिव थोरवे, अलिबाग – महेंद्र हरी दळवी, महाड – भरतशेठ मारुती गोगावले, उमरगा (अजा) – ज्ञानराज चौगुले, परांडा – डॉ. तानाजी सावंत, सांगोला – शहाजीबापू पाटील, कोरेगाव – महेश शिंदे, पाटण – शंभूराज देसाई, दापोली – योगेश कदम, रत्नागिरी – उदय सामंत, राजापूर – किरण सामंत, सावंतवाडी – दीपक केसरकर, राधानगरी – प्रकाश आबिटकर, करवीर – चंद्रदीप नरके, खानापूर – सुहास बाबर.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top