बीड – शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. ज्योती मेटे यांच्याबरोबर शिवसंग्रामच्या अनेक कार्यकर्त्यांनीही यावेळी शरद पवार पक्षात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या वेळीच ज्योती मेटे या शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार होत्या. त्यावेळी काही कारणाने त्यांनी प्रवेश केला नसला तरी आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी हा प्रवेश केल्यामुळे बीडच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार आहे. ज्योती मेटे यांनी शिवसंग्राम पक्ष चालविण्याचा प्रयत्न केला . मात्र त्यांच्या पक्षात लगेचच फूट पडली .
शिवसंग्रामच्या ज्योती मेटेंचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश
