सातारा – काही दिवसांपासून एसटी महामंडळाच्या शिवशाही बसचे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे सर्व ७९२ शिवशाहीची तपासणी विशेष अधिकार्यांमार्फत करण्यात येत आहे. या तपासणीचा अहवाल ४ जानेवारीपर्यंत सादर होणार आहे. एसटी महामंडळाने ८ वर्षांपूर्वी शिवशाही बस भाडेतत्त्वावर घेतल्या होत्या. मात्र, आता या बसची अवस्था दयनीय झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवशाहीचे अपघातही वाढले आहेत. बसमधील एसी बंद,सीट कव्हर आणि पडदे अस्वच्छ असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. या अनुषंगाने महामंडळाने प्रत्येक विभागातील शिवशाहींची विशेष तपासणी करण्याचे आदेश सर्व विभागप्रमुखांना दिले. तपासणीमध्ये आढळलेल्या त्रुटी, त्यासाठी करायच्या उपाययोजना याबाबतचा अहवाल संबंधित विभागास आणि मुख्य कार्यालयास ४ जानेवारीपूर्वी ई-मेलद्वारे सादर करण्याचे आदेश महाव्यवस्थापकांनी दिले आहेत.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |