शिवरायांची वाघनखे साताऱ्यात १९ जुलैला भव्य सोहळा

सातारा: छत्रपती शिवाजी महाराजांची बहुप्रतिक्षित वाघनखे स्साताऱ्यात पोलीस बंदोबस्तात आणण्यात आली आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते १९ जुलैला ती रसिकांना पाहण्यासाठी खुली केली जातील तेव्हा भव्य सोहळा पार पडणार आहे. वाघनखांच्या स्वागताला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंह भोसले उपस्थित राहतील. ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रहालयात वाघनखे आणि इतर शिवकालिन शस्त्रांच्या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात येईल.ही वाघनखे नंतर महाराष्ट्रातील एकूण ४ संग्रहालयांमध्ये प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय,नागपूरमधील सेंट्रल म्युझियम,कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये वाघनखे पाहता येणार आहेत.

लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून शिवरायांची ही वाघनखं महाराष्ट्रात आणली आहेत.तीन वर्षांसाठी ही वाघनखं आणली आहेत.वाघनखांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.वाघनखं महाराष्ट्रात १४ लाख ८ हजार रुपयांचा खर्च झाला असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top