कोल्हापूर – शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी गावातील ३०० जणांना विषबाधा झाली. शिवनाकवाडी गावात यात्रा सुरू आहे. यात्रेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन केले होते. या महाप्रसादातील खीर खाल्लानंतर नागरिकांना मळमळ, उलट्या आणि अस्वस्थ वाटू लागले. प्रकृती बिघडल्याने तात्काळ या सर्व नागरिकांना उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये दाखल केले होते. या घटनेची माहिती मिळताच गावात वैद्यकीय पथक दाखल झाले. आतापर्यंत काही नागरिकांना उपचारानंतर काही नागरिकांना घरी पाठवण्यात आले. तर १०० हून अधिक जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्व नागरिकांची प्रकृती स्थिर आहे.
शिवनाकवाडी गावातील ३०० जणांना विषबाधा
