‘शिर्डी-मुंबई वंदे भारत’ च्याजेवणात सापडले झुरळ

मुंबई- वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या जेवणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. एका प्रवाशाला जेवणात चक्क झुरळ सापडले आहे. दोन महिन्यात घडलेली ही दुसरी घटना असल्याने वंदे भारतमधील जेवणावरुन टीका होत आहे. प्रवाशाला ट्रेनमध्ये देण्यात आलेल्या जेवणातील डाळीत झुरळ सापडल्यानंतर प्रवाश्याने फटो, व्हिडीओ शेअर करत तक्रार केली आहे. यानंतर ही पोस्ट व्हायरल झाली असून नेटकरी त्यावर व्यक्त होत आहेत.

रिक्की जेसवानी हा तरुण वंदे भारतने शिर्डी येथून मुंबईला प्रवास करत होता. यावेळी ट्रेनमध्ये देण्यात आलेल्या जेवणात त्याला झुरळ सापडले. यानंतर त्याने आयआरसीटीसीकडे लेखी तक्रार दिली आहे. आम्ही वंदे भारत ट्रेनने शिर्डीवरुन मुंबईला येत आहोत. यावेळी आम्हाला देण्यात आलेल्या जेवणातील डाळीत एक मृत झुरळ सापडले आहे. मॅनेजरनेही याला दुजोरा दिला आहे.आम्ही याप्रकरणी लेखी तक्रार दिली आहे. हा नवा भारत आहे,” असा संताप या प्रवाशाने व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top