शिर्डी – साईभक्तांसाठी साई मंदिर संस्थानने आजपासून नवा उपक्रम सुरू केला आहे.या उपक्रमाद्वारे सामान्य दर्शन रांगेतील साईभक्तांना व्हीआयपी आरतीचा मान मिळणार आहे.आज झाशी येथील मनिष रजक आणि त्यांची पत्नी पुजा रजक हे दाम्पत्य नवीन वर्षाच्या पहिल्या आरतीचे मानकरी ठरले. पहिल्या आरतीचा मान मिळाल्याने रजक दाम्पत्य भावूक झाले.यापूर्वी सशुल्क पासधारक आणि दानशूर भाविक आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींनाच पहिली आरती करण्याचा मान मिळत होता. मात्र सामान्य साईभक्तांना देखील आता अतिमहत्त्वाच्या व्यक्तीनुसार सन्मान देत थेट साई समाधीजवळ उभे राहून आरती करता येणार आहे.दिवसभरातील मध्यान्ह आरती,धूप आरती आणि रात्रीच्या शेजारतीमध्ये ही संधी दिली जाणार आहे.
शिर्डीमध्ये साईभक्तांना व्हीआयपी आरतीचा मान
![](https://navakal.in/wp-content/uploads/2025/01/shirdi.jpg)