शिर्डीतील साई मंदिरात हार, फुलांवरील बंदी उठवली

शिर्डी- उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिर्डीतील साई मंदिरात फुले,हार नेण्यास असलेली बंदी उठवली आहे.राहता कृषी उत्पन्न बाजार समितीने यासंदर्भात याचिका दाखल केली होती. शिर्डीत ग्रामस्थांनी फटाके फोडून, एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला.

दोन वर्षांपूर्वी साई मंदिरात फुले, हार आणि प्रसाद आणण्यावर बंदी घालण्यात आली होती. कोविडमुळे हे निर्बंध लागू करण्यात आले होते. या बंदीमुळे शिर्डीतील फुलांचे व्यापारी आणि आजूबाजूच्या सुमारे ४०० एकर क्षेत्रात फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. बंदी हटविण्याच्या मागणीसाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी आठ महिन्यांपूर्वी मंदिराच्या प्रवेशद्वारावर आंदोलनही केले होते.याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समितीची स्थापना केली होती.त्यानंतर समितीच्या अहवालाच्या आधारे साई संस्थानच्या समितीने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला . या निर्णयाला मान्यता मिळावी यासाठी साई संस्थानने न्यायालयात दिवाणी अर्ज दाखल केला होता. त्यातच राहता कृषी उत्पन्न बाजार समितीनेही याचिका दाखल केली होती. यावर निर्णय देताना औरंगाबाद खंडपीठाने फूल,हार नेण्यास परवानगी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top