कराड- शिर्डीतील श्री दत्त मंदिर-लेंडी बाग येथून श्री साईबाबा पालखीचे शुक्रवार २९ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता कराडकडे प्रस्थान होणार आहे. शहरातील श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्यावतीने श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त हा पालखी सोहळा आयोजित केला आहे.
श्री क्षेत्र शिर्डी ते कराड श्री साई पालखी सोहळा शुक्रवार २९ नोव्हेंबर ते शनिवार १४ डिसेंबरदरम्यान चालणार आहे. कोल्हापूरचे ज्ञानेश्वर हरी काटकर यांच्या प्रेरणेने व गोविंद वसुदेव रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,अहमदनगरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे सोनटके,साई पालखी सोहळा समितीचे संस्थापक अध्यक्ष उदयसिंह देसाई यांच्या उपस्थितीत पालखी पूजन व प्रस्थान कार्यक्रम होणार आहे.पालखी सोहळ्यात चहा व नाष्टा सकाळी नऊ वाजता, दुपारी १२ ते ३ तसेच सायंकाळी ४ वाजता अल्पोपहार व रात्री ८ वाजता महाप्रसाद व विसावा होणार आहे.