कोल्हापूर- जिल्ह्यात उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.गेल्या कांही वर्षांपासून ऊसतोड मजुरांच्या टोळ्या कमी झाल्याने बहुतांशी साखर कारखान्यांनी ऊसतोडीसाठी यंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर सुरु केला आहे.मात्र अशा पद्धतीच्या ऊसतोडणीचा शेतकर्यांना मोठा फटका बसत आहे.
साखर कारखान्याला ऊस पाठवत असताना ऊसतोडणी यंत्राच्या साहाय्याने केली जात आहे. यावेळी तोडलेला ऊस ट्रॅक्टर ट्रॉलीत शीग लावून भरला जातो.मात्र शेतकऱ्याच्या शेतापासून ते कारखान्याकडे जात असताना तोडलेल्या उसाच्या कांड्या शिग लावल्यामुळे रस्त्यावरच पडत आहेत.त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे.वास्तविक सर्वच शेतकरी ऊसाच्या पाल्यामधून एकेक ऊसाची कांडी पगाराने मजूर लावून गोळा करतो.परंतु वाहन मालक ज्यादा भाडे मिळण्यासाठी आपले वाहन शिग लावून भरतो.त्यामुळे रस्त्यावरून वाहन कारखान्यापर्यंत जात असताना रस्त्यावरील खड्ड्यामुळे किंवा हादऱ्याने काड्या रस्त्यावर पडत आहेत.याचे नुकसान कारखाना किंवा वाहन मालक देत नाही तर शेतकऱ्यास याचा फटका बसत आहे.
शिरोळमध्ये यंत्र ऊसतोडणीचा शेतकर्यांना मोठा फटका
