शिमला-हिमाचल प्रदेशातील कालका शिमला मार्गाच्या चौपदरीकरण मार्गावरील एक निर्माणाधीन बोगदा कोसळला असून या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.शिमला कालका मार्गावर मल्याण ते चंलोंठी भागातील निर्माणाधीन बोगदा आज सकाळी कोसळला. या बोगद्याच्या प्रवेशद्वाराचे काम सुरु असताना ही दुर्घटना घडली. परवा संध्याकाळ पासूनच या भागातील माती ढासळत असल्याची बाब अभियंत्याच्या लक्षात आली. त्यांनी त्या ठिकाणाहून यंत्रसामुग्री व कामगारांना बाजूला केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. हिमाचल प्रदेशात सध्या पावसामुळे दरडी कोसळल्याच्या अनेक घटना घडल्यामुळे कामगारही भितीच्या छायेत आहेत.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |