मुंबई- विधानसभा निवडणुकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वातील शिवसेनेचे स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यामध्ये खुद्द एकनाथ शिंदे यांच्यासह रामदास कदम, गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ या ज्येष्ठ नेत्यांची फौज उतरवण्यात येणार आहे. यासोबत शिंदे-फडणवीस महायुती सरकारच्या काळात मंत्रिपद भूषवलेले गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, दीपक केसरकर, उदय सामंत यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे अभिनेता गोविंदा आणि शरद पोंक्षे यांचाही ४० जणांच्या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.
पायाला गोळी लागून झालेल्या अपघातानंतर अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसत आहेत. याशिवाय अक्षय महाराज भोसले, तेजस्विनी केंद्रे यासारख्या नव्या चेहऱ्यांना स्थान मिळाले आहे .
विधानसभा निवडणुकीसाठी जारी करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये राज्यातील दिग्गज नेत्यांमध्ये १) एकनाथ शिंदे, २) रामदास कदम, ३) गजानन कीर्तिकर, ४) आनंदराव अडसूळ ५) प्रताप जाधव, ६) गुलाबराव पाटील, ७) नीलम गोऱ्हे, ८) गोविंदा आहुजा, ९) शरद पोंक्षे, १०) मीना कांबळी ११) उदय सामंत, १२) शंभूराज देसाई, १३) दीपक केसरकर १४) तानाजी सावंत, १५) दादाजी भुसे, १६) संजय राठोड, १७) अब्दुल सत्तार, १८) भरत गोगावले, १९) संजय शिरसाट, २०) श्रीकांत शिंदे, २१) धैर्यशील माने,२२) नरेश म्हस्के, २३) श्रीरंग बारणे, २४) मिलिंद देवरा, २५) किरण पावसकर, २६) राहुल शेवाळे, २७) मनीषा कायंदे, २८)कृपाल तुमाने, २९) डॉ. दीपक सावंत, ३०) आनंद जाधव, ३१) ज्योती वाघमारे, ३२) शीतल म्हात्रे, ३३) राहुल लोंढे, ३४) हेमंत पाटील, ३५) हेमंत गोडसे, ३६) डॉ. राजू वाघमारे, ३७) मीनाक्षी शिंदे, ३८) ज्योती मेहेर, ३९) अक्षय महाराज भोसले, ४०) तेजस्विनी केंद्र यांचा समावेश आहे.