शिंदेंच्या शिवसेनेसोबत राहूनच
आगामी निवडणूक लढविणार

नवी दिल्ली – शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. निवडणूक आयोगानेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे 2024 च्या निवडणुका शिवसेनेसोबतच राहून लढविणार असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले की, महाराष्ट्रात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालीच लढविणार आहोत आणि आमची शिंदेंच्या शिवसेनेशी युती असेल. आता राहिला सवाल जागा वाटपाचा. तर त्यात फारशी अडचण येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेमधून जे कोणी बाहेर पडले ते आमच्यामुळे नाही तर उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची कास सोडून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला म्हणून त्यांचे लोक नाराज होते आणि त्याच नाराजीमुळे ते शिवसेनेतून बाहेर पडले आणि भाजपासोबत सरकार स्थापन केले. सध्या या सरकारचे महाराष्ट्रात चांगले काम सुरू आहे, असेही ते म्हणाले.

Scroll to Top