शाहूवाडी-कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी गावातील ग्रामदैवत असलेले म्हसोबा मंदिर मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले आहे.मोरी आणि ओढ्याचे पाणी मंदिरात शिरल्याने मंदिर पाण्यात बुडाले आहे.
करंजोशी गावापासून एक किलोमीटर अंतरावर म्हसोबा मंदिर आहे.या मंदिराला लागूनच डोंगरातून आलेला ओढा वाहतो.तसेच मंदिराच्या बाजूला कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर मोरी आहे. ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे मोरीचे पाणी जाणारे नळ मुजले आहेत. त्यामुळे पाणी पुढे सरकण्यास मार्ग नाही. परिणामी ओढ्याचे आणि मोरीचे पाणी मंदिरात शिरून मंदिर पाण्याखाली गेले आहे.